police station takrar arj in Marathi- पोलिस तक्रार अर्ज मराठी मध्ये

  police station takrar arj आपल्या देशाच्या सीमा चे रक्षण करण्यासाठी देशाला सैन्य आहे. परंतु देशातील गुन्हेगारी ट्रॅफिक व देशातील भागात शांती कायम राखण्याचे काम ही पोलिस यंत्रणा करत असते. मनुष्याचे असलेले भिन्न विचार यांमुळे भांडणे,गुन्हेगारी, बलात्कार, चोरी यांसारख्या घटना रोज कुठे ना कुठे आपणाला पाहायला मिळतात. जर आपल्या बाबतीत अशी घटना झाल्यास आपणाला पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवावी लागते.आज आपण police station arj कसं लिहायचा ते पाहू.

१ पोलिस तक्रार कोठे नोंदवावी.arj in marathi

२ पोलिस तक्रार चे प्रकार.

३ police station  takrar arj in marathi

४ पोलिस स्टेशन  तक्रार अर्ज online

४ पोलिस तक्रार अर्जात नमूद महत्वाच्या गोष्टी

५ पोलिस तक्रार घेण्यास टाळाटाळ करत असतील तर

६ आपल्या विरुद्ध खोटी तक्रार केली असेल तर काय करावे.

७ पोलिस पैश्यांची मागणी करत असतील तर

१ पोलिस तक्रार कोठे नोंदवावी. – जेव्हा आपल्यावर एखादी आपत्कालीन पऱ्स्थिती येते. तेव्हा आपण आपण आपल्या जवळच्या पोलिस स्टेशन ला तक्रार नोंदवावी. जर आपली बॅग पर्स मोबाइल चोरी झाली तर जिथून ति वस्तु चोरी झाली आहे तिथून जवळच्या पोलिस स्टेशन ला तक्रार करावी.

गाडी चोरी गेलीतर आपल्या गाडीची कागदपत्रे घेऊन लगेच जवळ च्या पोलिस स्टेशन ला  तिच्या चोरीची केस केली पाहिजे. त्या गाडीचा उपयोग चोर आणखी चोरी करण्यासाठी करू शकतात. आणि आणखी मोठ्या प्रॉब्लेम मध्ये आपण पडू शकतो.

Essay on pavsala in marathi https://rdguides.com/pavsala-essay-in-marathi/52/

२ पोलिस तक्रार चे प्रकार – पोलिस तक्रार २ प्रकारे करता येते एक आपण स्वत पोलिस स्टेशन मध्ये जाऊन आपल्यावर झालेला अन्यायाची माहिती देणे. त्यामध्ये ति घटना कोठे घडली.तुम्ही तीथ की करत होता. किती लोक होती ति घटना किती वाजता घडली.अथवा आपले म्हणणे लेखी अर्जात लिहून देणे. त्यानंतर पोलिस पऱ्स्थिती पाहून NC (Non cognizable offence) धाकल करून घेतात. गुन्हा जर गंभीर स्वरूपाचा असेल तर F.I.R. दाखल केली जाते. arj in marathi

लोकशाही मध्ये सत्ता लोकांची असते पण कायद्याचे ज्ञान समान्यपर्यंत पोचणे साठी पुस्तक एक चांगला पर्याय आहे

कायद्याची पुस्तके घ्या..https://amzn.to/48icysK

३ police station takrar arj- Marathi format police arj in marathi

                                                                                         दिनांक:23-5-2023

प्रति
मा. पोलीस उपनिरीक्षक
…………….पोलिस ठाणे,
पत्ता,

                        विषय: ————————————

महोदय,
————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————————-

आपला विश्वासू,
सही…………
नाव…………

                                         प्रथम उजव्या कोपऱ्यात आजची दिनांक लिहून डाव्या कोपऱ्यात त्या police station चे नाव लिहावे. त्यानंतर खाली विषय लिहावा आपली तक्रार कोणती आहे हे ४ ते ५ शब्दात लिहावी. नंतर त्याखाली सविस्तर पणे आपल्या बाबतीत लिहलेली घटना लिहावी. त्यामध्ये वेळ घटना घडलेली दिनांक कोणविरुद्ध तक्रार करयची आहे त्याचा उल्लेख करायचा.

घटनेची सविस्तर माहिती भरून खाली आपली सही व नाव लिहून जवळच्या पोलिस स्टेशन ला तो अर्ज देऊन यायचा.

3 पोलिस स्टेशन  तक्रार अर्ज online –

                             आपल्या शासनाने लोकांच्या सोई साठी ही सुविधा उपलब्ध करू दिली आहे. आपण घरी बसून आपली तक्रार देऊ शकतो. अथवा १०० नंबर वर कॉल करून आपली तक्रार नोंदवू शकतो. ऑनलाइन तक्रार करण्यासाठी खालील वेबसाइट आहेत.               
www.mahapolice.gov.in

                          २ www.mumbaipolice.gov.in  

कोणत्याही प्रकारच्या सभा उत्सव परवानगी घेण्यासाठी सुद्धा या वेब वर अर्ज करता येतो.

४ पोलिस तक्रार अर्जात नमूद महत्वाच्या गोष्टी –

१ अर्ज दिनांक २ पोलिस स्टेशन चे नाव ३ विषय ४ आणि घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती. पोलिसांना खोटी माहिती देणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे सत्य घटना सांगावी.

५ पोलिस तक्रार घेण्यास टाळाटाळ करत असतील तर

                                     पोलिस तक्रार घेण्यास टाळत असतील तर आपण आपल्या हाताने लिहलेला अर्ज जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन पोस्टाने त्या पोलिस स्टेशन च्या पत्यावर पाठवावा. त्यामुळे पोलिस तक्रार घेणार नाही आस होणारच नाही आणि आपली तक्रार घेतली जाते. पोलिस तक्रार घेत नसतील तर आणखी अनेक मार्ग आहेत तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता तुम्ही तहसील च्या पोलिस स्टेशन ला आणि तिथ घेतली नाही तर जिल्हा पोलिस ला कम्पलेन करू शकता.

६ आपल्या विरुद्ध खोटी तक्रार केली असेल तर काय करावे?

                                    बऱ्याच वेळा आपल्या ला अडकवण्यासाठी आपले विरोधक आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करतात. त्यामुळे आपणआला मानसिक त्रास होतो. विनाकारण आपला वेळ आणि पैसा वाया जातो. पोलिस आपणाला क्रॉस तक्रार देण्यास सांगतात जर आपण तिथ नसलो आणि आपण तिथ होतो असा खोटा उल्लेख केला असेल तर आपण सर्वप्रथम आपण तिथ नसल्याची पुरावे जोडून अर्ज लिहावा आणि ति तक्रार खोटी असल्याचे कोर्ट अथवा अप्पर पोलिस स्टेशन ला तसा अर्ज करावा.

७ पोलिस पैश्यांची मागणी करत असतील तर

                               पोलिस आपली तक्रार घेण्यास नकार देत असतील किंवा विरोधकला सामील होऊन आपल्याकडून पैसीयची मागणी करत असतील तर Anti corruption buero la takrar द्यावी. अथवा पैसे देताना विडीवो बनवून social मीडिया वर टाकावे. व तो विडियो पुरावा म्हणून acb  ला सादर करावा.

FAQ प्रश्नोत्तरे

आपल्या जवळचे पोलिस स्टेशन how to find police station near me ?

गूगल मॅप वर जाऊन पोलिस स्टेशन नियर मी असे टाइप करावे गूगल मॅप वर आपणाला आपल्या सर्वात जवळची पोलिस स्टेशन च लोकेशन दाखवेल . मग तुम्ही गूगल मॅप फॉलो करून पोलिस स्टेशन ल जाऊ शकता

what is emergency no in Maharashtra ?

पोलिस साठी – 100 अग्निशामक साठी – 112 ambulance साठी – 108 dail करा .

गणेश उत्सव परवानगी कशी काढावी ?

गणेश उत्सव परवानगी काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा . तुमच्या जिल्ह्याच्या oficial पोलिस वेबसाइट ला विजिट करून ऑनलाइन परवानगी काढावी. या वेब साईट वर अर्ज करताना तुमचा लोंग इन id बनवावा आणि मंडळाचे नाव मंडळाची स्थापना अध्यक्ष यांची नावे लिहावी. आणि ऑनलाइन अप्लाय करावा परवानगी लेट्टर मिळाले नंतर त्याची कॉपी काढून आपल्या जवळ ठेवावी .

सार्वजनिक सभा कार्यक्रम आणि आंदोलनाची परवानगी कशी काढावी?

आपल्या जवळच्या पोलिस स्टेशन ला जाऊन पोलिस अधीक्षक यांना लिखित स्वरूपाच अर्ज करावा. या मध्ये ज्या विषयासाठी परवानगी हवी आहे तो विषय अर्ज मध्ये नमूद करावे . कार्यक्रमाची वेळ तारीख आणि अंदाजे किती लोक येतील याचा उल्लेख त्या अर्ज मध्ये करणे आवश्यक आहे.

असे केल्याने सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अमानुष घटना रोखण्यात आणि सामाजिक शांतता राखण्यात पोलिस पूर्वतयारी करू शकतात.

what is police protection ? and how to get it ?

पोलिस प्रोटेक्षण हे 2 प्रकारे घेत येत एक paid आणि दुसर प्रकार हा मोफत आस असतो. प्रतेक पीडित व्यक्ति चे संरक्षण करणे हे पोलिसांचे प्रथम कर्तव्य आहे. जेव्हा आपणाला धमकीचे फोन येतात किंवा विशिष्ट समुदयकडून आपल्या जीवाला धोका असतो. तेव्हा आपण पोलिस प्रोटेक्षण ची मागणी करू शकतो. तसा अर्ज तुम्ही जवळच्या किंवा तुमच्या जिल्ह्याच्या पोलिस स्टेशन ल देऊ शकता.

कायद्याचे पालन करणे हे प्रतेक सुजन नागरिकाचे प्रथम कर्तव्य आहे . सर्वांनी संविधानचे पालन करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे गरजेचे आहे त्यामुळे लोकशाही टिकून सर्वांचे हक्क अबाधित राहतात.ज्या समाजात कायदा व सुव्यवस्था ठीक आहे तोच समाज प्रगती करतो . याचे भान प्रतेकणे ठेवले पाहिजे. अन्यावर आवाज उठवला पाहिजे. कोणताही प्रॉब्लेम छोटा असताना च त्यावर उपाय केला तर तो मोठा हॉट नाही हे प्रतेकणे द्यानत घेतले पाहिजे. तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला कमेन्ट करून सांगा.

पोलिस पद अनुक्रमे –

1 कॉन्स्टेबल – हे सर्वात खालचे पद असते यांचे काम अधिकारी यांचे सुचनांचे पालन करणे आणि पहारा देणे असते

2 वरिष्ठ कॉंस्टेबल – ही कॉन्स्टेबल च्या वरची पोस्ट असते.

3 हेड कॉंस्टेबल– 3-4 कॉंस्टेबल वर हेड कॉंस्टेबल असतो.

4 सहायक उप निरक्षक पोलिस– ही हेड कॉंस्टेबल च्या वरची पोस्ट असते.

5 पोलिस उप निरक्षक – हे पद सहायक पोलिस उपनिरक्षक यांच्या वरील आहे.

6 पोलिस निरक्षक – पोलिस निरक्षक याच्या कडे एक चौकी सांभाळण्यासाठी असते त्याच्या खाली पोलिस उप निरक्षक हेड कॉंस्टेबल आणि कॉंस्टेबल यांची टीम असते.

पोलिस अधिकारी पदे अनुक्रमे

1सहायक एसपी 2 अप्पर पोलिस अधीक्षक 3 पोलिस अधीक्षक 4वारिष्ट पोलिस अधीक्षक 5 पोलिस उपमहानिरक्षक 6 पोलिस महानिरक्षक 7 अतिरिक्त पोलिस महानिदेशक 8 पोलिस महानिदेशक

सहायक एसपी हे पद राज्य सेवा आयोग द्वारा घेतलेल्या परीक्षे मध्ये पास झाले नंतर मिळते. तर बाकीची सर्व पदे केंद्र शासनाच्या केंद्र सेवा आयोग द्वारे घेतले जाणाऱ्या परक्षेनुसार मिळते. पोलिस महानिदेशक हे पोलिस खात्यातील सर्वात मोठे पद आहे. तर कॉंस्टेबल हे सर्वात लहान पद असते. पोलिस खाते मध्ये भरती होयचे असेल तर प्रथम लेखी परीक्षा असते या

मध्ये जनरल माहिती गणित आणि विज्ञान हे विषय असतात. त्यानंतर फिजिकल घेतले जाते या मध्ये रनिंग गोळा फेक लांब उडी उंच उडी घेतली जाते त्यानंतर मेडिकल घेतले जाते आणि फायनल लिस्ट मध्ये नाव आले नंतर पोलिस खात्यात नोकरी मिळते.

2 thoughts on “police station takrar arj in Marathi- पोलिस तक्रार अर्ज मराठी मध्ये”

  1. प्रति
    मा. पोलीस उपनिरीक्षक पाचोड पोलीस ठाणे
    पत्ता गाव तांडा खुर्द
    विषय . सासऱ्या विषयी भांडण
    मी आणि माझी बायको आम्ही मजेत असताना सासऱ्याचा वारंवार होणाऱ्या त्रासामुळे मी ही तक्रार करत आहे माझी बायको ासर्‍याला सांगत असती की आम्ही खाऊन पिऊन सुखात आहे तरी मुलीचे वडील म्हणतात तू सुखी नाही आणि माझ्यावर गुन्हा दाखल करतात दोन दिवसाला फोन लावून मला त्रास देतात माझ्या बायकोला बळजबरी घेऊन गेले आहे माझ्या मुलाला काही झाल्यास याची जिम्मेदारी रखमाजी गायकवाड यांची राहील मला धमकी टाकतात की आम्ही मुलीचे दुसरे लग्न करून देऊ आणि माझ्या मुलाला आणि माझ्या बायकोला घेऊन जातात आमच्या घरात काही भांडण नाही तरी फोनवर ते म्हणतात की तुझं वाटोळ झालं

  2. दिनांक 15/07/2024
    मा. पोलीस उपनिरीक्षक
    पाचोड पोलीस ठाणे
    विषय सासर्‍याचे आणि माझे भांडण
    अर्जदार नरहरी दिगंबर घनवट
    विषय तो डायरेक्ट चेंज झाला खोटा आरोप रचला गेला बायकोचे आणि माझे भांडण आहे असे सांगितंल गेल माझ्यावर केस केली आणि पोलीस साहेबांना पण ती केस घेतली माझी परत केस घेतली नाही माझ्याकडे सासर्‍याच्या खिलाफत सर्व रेकॉर्डिंग सासरा दारू पिऊन बोलतो 1मुलगी म्हणते मी खाऊन पिऊन सूखात आहे सुखात आहे
    2 मुलगी म्हणते माझ्या संसाराचं वाटोळं करायचं का तुम्हाला
    3मुलगी म्हणते याला त्याला सांगत जाऊ नका मग मला त्रास होतो
    तो सासरा पूर्ण मला फोन लावला तर दारू पिऊन बोलतो आणि अरे तुरे वर बोलतो
    मुलगी सुखात असून तो म्हणतो सुखात नाही
    मग सुख नेमके लागतं तरी कोणतं
    माझ्या अर्जाचा पटकन मनावर घ्यावा
    माझी पोलीस स्टेशनला केस सुद्धा घेतली नाही माझ्याकडे असलेले सर्व सुद्धा बघितले नाही तेथे मुलीचं डोकं भरतात आणि मुलीला बळजबरी करतात तुकाराम तांबे राहणार डोणगाव हा माणूस सासरच डोकं भरून देणारा आहे भांडण लावणारा बाप लेके चा फोन चालू असताना फोन जरा कानाला लागून पण कटला तर बाप बोलतो होईल याचा पण विचार लावीन मी शोध दमना फोन कस काय कटला काय कटला तू माझी आहे का त्याची आहे तू मला फोन का लागत नाही असे बार-बार धमकी टाकतो तिला माझ्या घरी येऊन मुलगी बळजबरी घेऊन जातो मुलगी जरा जाण्यास नाकार दिला तर तिला इथे धमकी टाकतो मी औषध फेल नाही तर घरी जाऊन फाशी घेईन यामध्ये काही खोटं असलं तर मी कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे
    सांगण्यासारखं आणखीन बरंच काही आहे माझं सुद्धा सांग ना झालं नाही. तो माणूस स्वतःची मुलगी सुद्धा वागू देत नाही तर सून काय वागेल रखमाजि गायकवाड आंबेकर साहेबांनी माझी केस हातात घ्यावी आणि माझ्याकडे पण सोबोत बघावेत मला परेशान केलंते नाही बघत
    आपला विश्वासू
    सहि
    नाव नरहरी डिगांबर घनवट

Leave a Comment