magel tyala vihir yojana विहीर अनुदान योजना 2024

magel tyala vihir yojana विहीर अनुदान योजना 2024 महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन विहीर घेणे साठी खालील प्रमाणे अर्ज करावा.

magel tyala vihir yojana विहीर अनुदान योजना

महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामीण भागातील लोकांना रोजगार आणि शेतकऱ्यांचे सिंचन प्रश्न सोडवण्या साठी सरकार ने ही योजना आणली आहे. या मध्ये विहीर खांदण्या साठी सरकार 3 लाख रुपये तर विहीर बांधकाम करण्यासाठी सरकार 1 लाख रुपये अनुदान देत आहे. असे मिळून सुमारे 4 लाख रुपये अनुदान सरकार देत आहे. सरकार चे उदिष्ट राज्यात 350000 विहिरी खोदणे आहे. या मुळे महाराष्ट्रातील सिंचनाखालील क्षेत्र वाढून शेती उत्पादन वाढेल.

मागेल त्याला विहीर योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो ?

खालील प्रवर्गातील लोक या योजनेचा चा लाभ घेऊ शकतातmagel tyala vihir yojana

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या व विमुक्त जाती,दारिद्र्य रेषेतील व्यक्ति,अल्पभूधारक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

सुकन्या समृद्धी योजना अधिक वाचा

best quality पाण्यातील मोटर घेण्यासाठी इथ क्लिक करा

पात्रता magel tyala vihir yojana- मागेल त्याला विहीर योजना पात्रता –

1 योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशी व्यक्ति अल्प भूधारक असला पाहिजे magel tyala vihir yojana

2 तो जॉबकार्ड धारक असला पाहिजे

3 त्याच्या सातबारा वर विहरीची नोंद असली नाही पाहिजे

4 सलग एक एकर जमीन असावी

5 त्याचा 8 अ चा उतारा असावा

6 शेतकरी एक पेक्षा जास्त विहीरीनसाठी अर्ज करू शकतो

मागेल त्याला विहीर योजने साठी लागणारी कागदपत्रे कोणती ?

1 अल्पभूधारक प्रमाणपत्र –

मागेल त्याला विहीर या योजने अंतर्गत तुम्हाला जर विहीर योजने चा लाभ घ्यायचा असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला अल्पभूधारक प्रमाणपत्र लागेल त्या साठी माननीय तहसील कार्यालय इथ अर्ज करून अल्पभूधारक प्रमाणपत्र काढून घ्यावे किमान 5 एकर पेक्षा कमी क्षेत्र असावे. हे प्रमाणपत्र अर्ज केलेल्या तारखे पासून 3-5 दिवसात मिळते.

हे प्रमाणपत्र असे असते –

magel tyala vihir yojana
अल्पभूधारक प्रमाणपत्र

इतर कागद पत्रे –

1 अल्पभूधारक प्रमाणपत्र

2 ग्रामपंचायतीचा ठराव magel tyala vihir yojana

3 लाभार्थी चे आधारकार्ड

4 रहिवासी प्रमाणपत्र

5 जॉबकार्ड

6 सातबारा व 8 अ चा उतरा

7 3 पासपोर्ट साइज फोटो

8 इतर कोणतेही योजनेचा लाभ न घेतलेले स्वय घोषणा पत्र

9 क्षेत्र सामाईक असेल तर इतर शेतकरी चे न हरकत पत्र

10 मोबाइल नंबर व मेल id

11 चालू बँक खाते

12 आणि उत्पन्नाचा दाखला

अर्ज कोठे करावा ?

अर्ज 3 प्रकारे करता येतो

1 ऑनलाइन

पण ही सेवा अजून चालू झाली नाही.

2 ग्रामपंचायत ला अर्ज करणे –

या मध्ये योग्य कागदपत्रे जोडून मनरेगा अंतर्गत गरजू शेतकऱ्याने ग्रामपंचायत च्या अर्ज पेटी मध्ये आपला अर्ज टाकावा. ग्रामपंचायत त्यानंतर ठराव मांडून या योजने साठी लाभार्थी निवड करते. लाभार्थी निवड झाले नंतर रोजगार सेवकाच्या माध्यमातून जॉबकार्ड धारकांची नावे सुचवून तो अर्ज गट विकास अधिकारी पंचायत समिति कडे पाठवला जातो. तिथून विहीर मंजूर झाले नंतर पंचायत चे अधिकारी येऊन प्रत्यक्ष जागेचा पंचनामा करून जातात आणि मग विहीरीच्या कामास सुरवात होते.

सरकारी अनुदान जरी 4 लाख रुपये मिळत असेल तरी ही प्रक्रिया खूप वेळ खाऊ आहे. त्या साठी तिसरा पर्याय आहे यात धावपळ होते पण काम लवकर होऊन लवकर पैसे जमा होतात. तसेच सर्व सरकारी कर्मचारी आपल्या सोई नुसार काम करतात त्यामुले या योजनेला खूप विलंब होतो. magel tyala vihir yojana

3 स्वत: करणे –

ग्रामपंचायत जर सुस्त असेल तर या कामात खूप विलंब होतो. तसेच रोजगार सेवक 25 ते 50 हजार पर्यन्त पैशयची मागणी करतात. त्यामुळे त्याचा त्रास गरीब लोकांना होतो. त्या पेक्षा सर्वात चांगली पद्धत म्हणजे आपले काम स्वत करणे या मुळे कमीत कमी वेळेत अनुदान प्राप्त होऊन आपली विहीर तयार होते.

सर्वात प्रथम अल्पभूधारक प्रमाणपत्र काढून घ्यावे हे प्रमाणपत्र काढण्यासाठी माननीय तहसीलदार यांना अर्ज करावा लागतो हे प्रमाणपत्र 3-4 दिवसात मिळून जाते . त्यानंतर विहीर योजनेचा नमुना अर्ज घेऊन त्या अर्जात दिले प्रमाणे माहिती भरून घ्यावी. त्या मध्ये एक चेक लिस्ट मिळते त्या प्रमाणे अर्जदाराचे नाव लिहून संपूर्ण पत्ता मेल id लिहावा. त्यानंतर चालू सातबारा व 8 अ चा उतरा जोडावा. सातबारा हा 3 महिन्याच्या आतील असावा.

त्यानंतर ग्रामपंचायत मधील सरपंच रोजगार सेवक आणि ग्रामसेवक यांना घेऊन जागेचा पंचनामा करावा जय जागेवर विहीर खोद काम कारीचे आहे तेथील फोटो काढून तो अर्जा सोबत जोडावा. त्यानंतर ग्रामपंचायत कडून ठराव मंजूर करून तो ठराव ची प्रत अर्जा सोबत जोडावी.magel tyala vihir yojana

त्या नंतर त्या अर्जाला अल्पभूधारक प्रमाणपत्र जोडून घ्यावे. आपले आधारकार्ड ,रेशनिग कार्ड जोडावे. 100 रुपये किमतीचा स्टंप पेपर घेऊन त्यावर हमीपत्र लिहून घ्यावे आणि कचेरी मध्ये नोंदवावे. त्या अर्जा सोबत आपले रोजगार हमी योजनेचे जॉबकार्ड जोडावे.

हे सर्व कागद पत्रे जोडल्यानंतर परत एकदा चेक करावीत काही राहिले असल्यास ते दुरुस्त करावे. तो अर्ज घेऊन पंचायत समिति इथ विहीर योजनेच्या विभागात जाऊन तो अर्ज जमा करावा .

मग अधिकारी आपला अर्ज चेक करतील काही चुका असल्यास किंवा काही कागदपत्रे कमी जास्त असल्यास ते आपणाला कल्पना देतील त्याची पूर्तता आपण करावी. कागदपत्रे पूर्ण जमा केल्यानंतर आठवड्यातून एकदा पंचायत समिति मध्ये जावे त्यामुले लवकर विहीरीची मंजूरी मिळते.

विहीर मंजूर झालेनंतर –

अधिकारी यांनी सर्व कागदपत्रे तपसल्या नंतर विहीर मंजूरी चे पत्र आपणला मिळते. एकदा विहीर मंजूर झाले नंतर त्या विभागाचे अधिकारी येऊन प्रत्यक्ष त्या स्थळाचा पंचनामा करतात. त्या वेळी ते आखणी करून देतात त्या प्रमाणे 36 चा घेर आणि 45 फुट खोल विहीर खंदण्यास सांगितले जाते. कठीण रान लागले नंतर जई काढावी. ती चा घेर 30 फुट असावा. पंचायत समिति चे अधिकारी पंचनामा करताना सरपंच आणि ग्रामसेवक हजर असावे लागतात.

त्यां नंतर अधिकारी गावातील रोजगार हमी योजने अंतर्गत नोंदणी असलेले गावातील जॉबकार्ड धारक लोकांची यादी मागवतात. गावातील 10 -15 जॉबकार्ड धारक ज्यांचे बँक खाते चालू आहे व बँक खाते ला आधारकार्ड लिंक आहे अशी लोकांची यादी आपण नेऊन द्यावी. जॉबकार्ड धारक यांची नावे आधार कार्ड आणि बँक पासबूक चे झेरॉक्स नेऊन जमा करावी .जॉबकार्ड धारकांचे खाते चालू आहे का नाही याची काळजी घेणे फार महत्वाचे असते.

ही यादी अधिकारी यांचे कडून चेक केली जाते. त्यातील काही नावे कमी केली जातात. आणि फायनल लिस्ट बनवली जाते. त्यानंतर आपण विहीर खोदण्यास सुरवात करू शकतो. विहीर खोदताना सुरवातीला फोटो काढून ठेवावे त्यानंतर अनुक्रमे 10 फुट 20 फुट आणि 30 फुट काम झाले नंतर फोटो काढवे. magel tyala vihir yojana

ई मस्टर म्हणजे काय ?

विहीर खोदताना जॉबकार्ड धारक याची हजेरी लावण्यासाठी हजेरी पत्रक मागणी दर आठवड्याला करावी लागते. त्या साठी ई मस्टर मागणी अर्ज लिहावा. आणि त्या सोबत विहरीवर काम करणाऱ्या माणसाची नावे बँक खाते क्रमांक आणि बँक शाखा लिहावी. व ते अर्जा सोबत जोडावे .magel tyala vihir yojana

ई मस्टर नमुना अर्ज

magel tyala vihir yojana
ई मस्टर

हा अर्ज जमा केल्या नंतर 4-5 दिवसात तुम्हाला मस्टर मिळते. ते घेऊन यावे विहिरीवर काम करणाऱ्या मंजुरांची सही किंवा अंगटा घेऊन त्या मस्टर वर रोजगार सेवक आणि सरपंच यांचा शिक्का घ्यावा. त्यानंतर ते मस्टर पंचायत समिति मध्ये जाऊन जमा करावे. आणि नवीन मस्टर ची मागणी मागील प्रमाणे करावी.

अशी मागणी विहीरीचे खोदकाम काम पूर्ण होईपर्यंत करावी. 10 – 15 लोकांमध्ये आपणाला साधारण 14-ते 15 वेळा 3 महिन्या पर्यन्त मागणी करावी लागते. विहीरीचे 10 फुट – 20 फुट 30-फुट काम झाले नंतर अधिकारी विहीर पाहणी करता येतात व फोटो काढतात. विहीरीचे काम नियमाला धरून चालले आहे का नाही ये चेक करतात आणि आपला अहवाल ऑफिस मध्ये सादर करतात. magel tyala vihir yojana

एक मस्टर सही कारून पूर्ण झाले की त्याची रक्कम 2-3 दिवसात कामगार च्या खात्यात जमा केली जाते. 3 लाख पर्यन्त रक्कम जमा केली जाते. त्यानंतर राहिलेले एक लाख विहीर बांधकाम झाले नंतर जमा केली जाते. विहीर बांधकाम करताना वापरले जाणारे सीमेंट आणि लोखंड यांची gst बिले शासनाला जमा करावी लागतात. विहीर बांधतान ही काळजी घेणे गरजेचे आहे. magel tyala vihir yojana

साधारन या संपूर्ण योजने ला कमीत कमी 8 महीने आणि जास्तीत जास्त 2 वर्षांचा कालावधी जातो. आचार संहिता आणि आपत्कालीन स्थिति मुळे आणखी वेळ जाऊ शकतो. एकदा विहीर मंजूर झाले नंतर 2-ते 3 महिन्याच्या आत आपणाला पैसे मिळतात. ही महाराष्ट शासनाचा अत्यंत चांगली योजना आहे त्यामुले रोजगार निर्मिती होतेच आणि शेतकऱ्याचा पाण्याचा प्रश्न ही मिटतो. या योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा आणि आपले उत्पन्न वाढवावे. magel tyala vihir yojana

f &q

मागेल त्याला विहीर योजने अंतर्गत किती पैसे मिळतात ?

मागेल त्याला विहीर योजने अंतर्गत शेतकऱ्याला 4 लाख इतके अनुदान मिळते. अनुक्रमे बांधकांम करण्यासाठी 1 लाख रुपये आणि खोदण्यासाठी 3 लाख रुपये मिळतात.

विहीर अनुदान योजना कागदपत्रे ?

अल्पभूधारक प्रमाणपत्र, ग्रामपंचायतीचा ठराव , लाभार्थी चे आधारकार्ड , रहिवासी प्रमाणपत्र , जॉबकार्ड ,सातबारा व 8 अ चा उतरा, 3 पासपोर्ट साइज फोटो ,इतर कोणतेही योजनेचा लाभ न घेतलेले स्वय घोषणा पत्र ,क्षेत्र सामाईक असेल तर इतर शेतकरी चे न हरकत पत्र, मोबाइल नंबर, व मेल id, चालू बँक खाते,आणि उत्पन्नाचा दाखला.

3 thoughts on “magel tyala vihir yojana विहीर अनुदान योजना 2024”

  1. पेन्शन धारक लोक याचा लाभ घेऊ शकतो का

Leave a Comment